शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी

 सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी

सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या 
आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी 
घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.

१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी  
२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित  करणे.
३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.
४. जात पडताळणी बाबतची नोंद.
५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
१. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची   स्वाक्षरी.
१५. नाव बदलाची नोंद.
१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर /  पदग्रहण अवधी नोंद.
१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.
२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या  वेतन निश्चितीची नोंद.
२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची  नोंद.
२५. रजा प्रवास सवलत नोंद.
२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
२८. सेवा पडताळणीची नोंद.
२९. जनगणना रजा नोंद.
३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
३१. हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

BABASAHEB DARADE: 1 JULY 2020 महिन्यात होणारी वार्षिक वेतनवाढ

BABASAHEB DARADE: 1 JULY 2020 महिन्यात होणारी वार्षिक वेतनवाढ :  जुलै महिन्यात होणारी वार्षिक वेतनवाढ : शासकीय कर्मचारी यांचे जुलै महिन्यात ...